True Facts

Posted: ऑगस्ट 12, 2015 in इतर कविता

खूप वाईट वाटत ना…

जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर
बोलतो
आणि ती व्यक्ती आपल्याला
इग्नोर करते .

काय आयुष्य आहे ,

तरीही त्याच व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी आपला जीव उतावळा होत
असतो .

जिकडे त्रास होतो तिकडेच आपण
जाण्याचा प्रयत्न
करतो…

Advertisements
कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती… 
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते
 
जीन्स टी शर्ट regularly घालते 
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते 
 
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते 
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर ‘नाही’ म्हणते 
 
पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते
 
लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते
 
ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते
 
बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते

आयुष्याचं ध्येय ठरवताना “६-५-४-३-२-१” या क्रमाने विचार करावा:
६ आकडी पगार,
५ खोल्यांचा फ्लॅट,
४ चाकी गाडी,
३ दिवसांची मस्त सुट्टी,
२ झकास मैत्रिणी आणि
१ साधी-सरळमार्गी बायको!

समीर नाव होत त्याच . लग्नानंतर आयुष्यात आलेला पहिला मुलगा . वयाने लहान पण मनाने आणि बुद्धीने खूप मोठा होता . त्याच्याशी बोलताना परकेपणा कधीच वाटला नाही . नेहमी तो माझ्या जवळचा वाटायचा .कधी कधी तर अस वाटायचं कि विवेक ऐवजी हाच जर माझ्या आयुष्यात आला असता तर .…..पण म्हणतात ना नियतीने सर्वांच्या गाठी बांधलेल्या असतात तसच काही झाल असाव . त्याचा फोटो मागूनही त्याने कधी पाठवला नाही , तो नेहमी म्हणायचं कि माणसाची प्रतिमा त्याच्या बोलण्यातून प्रकट होते . अस समाज कि तू आंधळी आहेस आणि तुला एक शिल्पकृती बनवायची आहे . मी खूप प्रयत्न केला त्याची प्रतिकृती बनवण्याचा पण मनासारखी जमलीच नाही . एका एकदम सामान्य मुलाची मुर्त्य माझ्या हातून घडली . अस वाटलं त्याच्या चेहऱ्यातून मुख्यतः त्याच्या डोळ्यातून त्याच्या मनातले सराव भाव प्रकट होतात . जणू काही त्याचे डोळेच माझ्याशी मूक संवाद साधत आहेत . एकदा त्याने phone केला आणि माझ्या आवडीचे colour विचारले , मी तपकिरी आणि cream colour सांगितले . त्याने त्या दिवशी तपकिरी colourcha shirt आणि cream colourchi pant घेतली . मग माझ्या मनातल्या आकृतीलाही मी तेच वस्त्र चढवले . खूप गोड दिसत होता तो . कधी motor cycle वर बसून मला फिरवताना ,कधी पावसाच्या सारींपासून एकाच छत्रीतून स्वतःचा बचाव करताना दिसायचा . त्याच्याबरोबर फिरताना अस वाटायचं कि हा प्रवास कधीच संपू नये . आणि लवकर तो सत्यात उतरावा.
 

1 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसाला chating तिंग वरून celebrate केलेला तो वाढदिवस मी कधीच विसरू शकत नाही . ज्या अपेक्षा मी विवेक कडून केल्या होत्या त्या सर्व त्याने पूर्ण केल्या . माझ्याकडून कशाचीही अपेक्षा न करता ……! कस जमत रे तुला हे . माझा नवरासुद्धा काही न काही तर शारीरिक सुखाची अपेक्षा करतो , पण तू मात्र फक्त देत गेलास अमाप सुख , ज्यात मी पूर्णपणे न्हाऊन निघाले .

Orkut मधाळ तुझ नाव …..मनापासून ! तुझ प्रोफिले खूप आवडल आणि तुला मैत्रीसाठी विचारलं . वाटलं होत सर्व मुलांप्रमाणे तुही बोलशील काय करतेस ? नाव काय ? राहायला कुठे ? BF आहे का ? फोन no.दे . पण तू यातला एकही प्रश्न विचारला नाहीस . तुझा पहिलाच प्रश्न मनाला स्पर्शून गेला कधी कुणावर प्रेम केल आहेस का ? या प्रश्नाने माझ्या आयुष्याच्या पुस्तकातली सर्व पाने उलगडली गेली . पण खूप विचारांती ठरवलं कि इतक्या लवकर याला काही सांगायचं नाही . स्वतःची personal life अशी कुणाबरोबर शहरे करायची नाही . मी तुला काहीच नाही सांगितलं . घरी आई ,वडील आणि भाउ यांच्याबरोबर राहते . स्वतःची separate room आहे ,कॉम्पुटर engineering करते सर्व खोट सांगितलं . तास न तास तुझ्याशी chating करायचे पण तुला काही खर सांगितलं नाही . तीन दिवसांच्या बोलण्याने तू मला पूर्ण जिंकलास . अशा स्वभावाचा मुलगा मी आजपर्यंत कधी बघितला नव्हता . तुझ्याशी chatting करताना रोहन , राज यांच्याशीही बोलायचे पण त्यांच बोलन आणि तुझ बोलन यात कितीतरी फरक hota . जगापेक्षा कितीतरी वेगळा होतास . तुला फसवण मला जमलाच नाही रे . काय अशी जादू केलीस कोण जाणे पण चौथ्या दिवशी ठरवलं तुला सर्वकाही खर सांगायचं . तसा scrap तुला केला , माझ लग्न होऊन 3 वर्ष झालेत . मी माझ्या नवरयाबरोबर देल्हीला राहते . हे सर्व ऐकून तू माझ्याशी मैत्री ठेवणार नाहीस , नको ठेउस , bye. एवढाच scrap होता तो . पण तुही तितकाच शांत reply दिलास . लग्न हे एक बंधन आहे , त्यात तू अडकली आहेस .पण तुझ मन अजूनही प्रेमासाठी आसुसलेल आहे शारीरिक नाही तर मानसिक . मी ठरवलं होत कि तुला काही reply द्यायचा नाही . या आधी मी बर्याच जणांना अस सांगतल होत पण कोणी मला reply केला नाही . खोटारडी म्हणून माझा अपमान केला . पण कोणी माझ्या मनात उतरून बघितलं नाही कि मी का अस वागते ? पण तू मात्र बरोबर ओळखलस . मनकवडा आहेस कि काय रे ? पूर्ण जिंकलस रे मला तू पूर्ण जिंकलस . ठरवलं , कि तुला सर्व सांगायचं .

 
College मध्ये असताना विवेकशी प्रेम झाल . जातीच्या कारणामुळे पळून जून कोर्टात लग्न केल . विवेक oberoy च्या ‘साथिया ’ फिल्म सारख शेवटी घरी कळल्यावर आम्ही gajiyaabadla flat घेऊन राहायला लागलो . सुरुवातीचे दिवस खूप सुखात गेले .विवेकाने फक्त चंद्र तारे तोडून ते माझ्यावर उधळायचे बाकी ठेवले होते . इतके सुख त्याने मला दिले . पण काही दिवसातच ग्रहणाचे काळे ढग आकाशात दिसायला लागले ते माझ्या सासुबाइन्च्या रूपाने . तिला मी सून म्हणून मान्य नव्हते .पण विवेकसमोर त्या काही बोलायच्या नाही . पण तो office ला गेल्यावर मात्र बारा तास मला टोमणे सहन करायला लागायचे . तो थकून यायचा म्हणून मी त्याला काही न सांगता सहन करत होते . पण एकदा सहन करण्याची क्षमता संपली आणि त्याला सर्व काही सांगितलं . आश्चर्य म्हणजे त्याने त्याच्या आईची बाजू घेतली . Tevhaa मी 2 महिन्यांची pregnant होते . भांडणामध्येत्याने मला ढकललं आणि मी kitchen च्या ओट्यावर पोटाशी पडले . हा माझा पहिला miscourage. सासूबाई सर्व बघत होत्या पण काही बोलल्या नाही . त्यानंतरही एका वर्षाने असाच झाल तेव्हा मी जमिनीवर पडले तो दुसरा miscourage . मला काही कळायचं नाही कि काय कराव आई वडिलांकडे जायला तोंड नव्हत .सर्काशिताल्या वाघासारखी माझी अवस्था झाली होती . नंतर मी काही बोलायचे नाही .सासूबाई lucknow ला निघून गेल्या आणि सर्व त्रास कमी झाला . पण विवेकबद्दल असलेल प्रेम कितीतरी पटींनी कमी झाल . ज्या मुलासाठी मी स्वतःच्या आई वडिलांचा विचार न करता घरातून पळून आले . त्याने माझा जराही विचार karu नये ? दिवसभर घरात बसून कंटाळा यायचा मग time pass म्हणून orkut वर एक fake account उघडल आणि सहज म्हणून मुलांसोबत time pass करायचा मजा यायची सर्वांना छाल्ताना , मी chat करताना त्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचायची खूप खेळायचे त्यांच्या मनाशी , आणि मग कंटाळा आला कि त्याला सांगायचं माझ लग्न झाल आहे . तो मुलगा आपोआप बोलायचं बंद करायचा .पण तू तास काही केल नाहीस . बाकीच्यांना कलाल कि माझ लग्न झालेलं आहे ,तर कधी मला विचारायचे नाही कि तो कसा आहे ? काय करतो ? पण तू मात्र मला त्याच्याविषयी सर्व विचारलास मलाही तुझ्यापासून काहीही लपवता आल नाही .जी गोष्ट मी आजपर्यंत माझ्या मित्र -मैत्रीणीना आई -वडिलांना देखील नाही सांगितली तइ सर्व तुला सांगितली तुझ्याशी बोलताना वेळ कसा निघून जायचा कळायचं सुद्धा नाही.
 

त्या दिवशी पहिल्यांदा तू call केलास , पहिल्यांदा मी तुझा आवाज ऐकत होते .तुझ्या बोलण्याकडे maaz लक्षच नव्हत , तुझी मधाळ वाणी , बोलण्यातला आदब्शिर्पना , नम्रता यातच मी गुंग झाले . गमतीने तुला विचारलं कि तू गायक आहेस का ? माझ्या सात पिड्यांपासून एकही गायक आमच्या घरात जन्मला नाही हे तुझ उत्तर , मग chatting करतानाही तुझा आवाज ऐकत आहे अस वाटायचं . 3 महिने झाले आपल्या मैत्रीला मी तुझे सर्व उपदेश पाळण्याचा प्रयत्न करत होते . दर मंगळवारी तू माझ्यासाठी प्रार्थना करायचास , स्वतःसाठी का नाही मागितलास रे ? का आम्हालाच भरभरून दिल ? तू नेहमी म्हणायचास कि everything will be all right देव सर्व काही ठीक करेल . तो माझी प्रार्थना जरूर पूर्ण करेन .

विवेक आणि मी काही दिवसांसाठी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तुझ्याशी नित बोलताच आल नाही . कधी जाव तुझ्याशी बोलते अस वाटत होत . पाच दिवसांनी गाजीयाबाडला आलो , मी सतत विवेक च्या office मध्ये जाण्याची वाट बघत होते . त्याने जसा घराच्या बाहेर पाय ठेवला तसच विजेच्या वेगाने येऊन कॉम्पुटर चालू केला आणि आश्चर्याचा धाक्का बसला तुझा एकही scrap नव्हता . तुला call करण्याचा प्रयत्न केला पण तोही लागत नव्हता मी खूप वेळ विचार केला मग म्हटलं मी इथे नसल्याने तू scrap केला नसशील .तुला scrap पाठवले SMS केले पण काही उत्तर मिळाले नाही .एवढा राग येतो तुला माहित नव्हत कारण गेल्या 3 महिन्यात एकदाही रागावला नाहीस आणि आज मात्र एकदम नातच तोडून टाकल्यासारख वागत होतास . 2 दिवस मी वाट बघितली कॉम्पुटर समोर बसून .तुझ्या online येण्याची vaat बघत होते पण तू online आला नाहीस . तुझा एकही reply आला नाही . मग मात्र खूप बावरले काय घडल काहीच काळात नव्हत . अचानक आठवण आली कि email च account open करून बघाव . त्यात तुझा mail बघितला आणि अधाशासारखी वाचायला सुरुवात केली.

 
माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले क्षण मी तुझ्यासोबत घालवले . हे क्षण मी माझ्या मनाच्या कप्प्यात बंदिस्त करून ठेवले आहेत . ते फक्त माझे आहेत . त्याच्यावर कुणाचा हक़्क़ नाही . आता मी जे काही तुला सांगणार आहे त्यावर कदाचित तुझा विश्वास बसणार नाही . पण दुर्दैवाने हे सर्व खर आहे . मी engineering student आहे ,मुंबईला राहतो हे सर्व खर आहे .पण मी कुठलाही part time job करत नाही , माझे वडील watchman नाहीत , आई दुसर्यांच्या घरी धुनी भांडी करत नाही . तू जस मला सांगितलं होतास कि तू अविवाहित आहेस तसच मी तुझ्याशी खोत बोललो यासाठी मला माफ कर . I am really sorry for that.माझे वडील import- export चा buisiness कटात , आई cardiologist आहे . एक वर्षापासून मला blood cancer आहे , आणि तुला माहीतच असेल कि यावर काही इलाज नाही . माझंही तेच झाल आहे .orkut वरच्या कुठल्याही मित्राला मैत्रिणीला हे माहित नाही . तुझ्याप्रमाणे माझाही हे fake account आहे आणि यातले सगळे मित्र अनोळखी आहेत . पण तुझ्याशी मैत्री पलीकडच नात निर्माण झाल त्यामुळे तुझ्यापासून मी काहीही लपाउ शकत नाही .जेव्हा मी तुला सांगायचो कि मी job ला जातोय तेव्हा मी आईबरोबर दवाखान्यात जायचो . तिने प्रक्टीचे बंद केली आणि पूर्ण वेळ मला देते माझ्या देखभालीसाठी . ज्या दिवशी मला cancer असल्याच कलाल त्या दिवशी दोघांवरही आभाळ कोसळल . आमच्या हसत्या खेळत्या घराला कोणाचीतरी नजर लागल्यासारख झाल . खूप इलाज केले पण काही झाल नाही , मंत्र -तंत्र , उपास -तपास , नवस सर्व काही झाल पण काही उपयोग झाला नाही . माझ्या खूप जवळच्या मित्रांनाच हे माहित आहे .मला कॉलेज मध्ये जायला बंदी केली म्हणून मीही घरीच orkut वर नवीन friend बनवन त्यांच्याशी गप्पा मारणे यात वेळ घालवायला लागलो . तू ज्या दिवशी मला mail केला कि , I want to do sex with you तेव्हाच मला कलाल कि काहीतरी प्रोब्लेम नक्कीच आहे आणि तूच मला खर काय ते सांगशील आणि तसच घडल.
 

त्या दिवसापासून दररोज बाप्पाजवळ प्रार्थना करायचो कि सर्व काही ठीक होऊ दे . तुझ्या miscorage बद्दल वाचून तर अंगावर काटाच आला .doctor ने तुला सांगितलं होत कि परत तू conceive नाही करू शकणार पण माझा देवावर पूर्ण विश्वास होता दर मंगळवारी बाप्पाकडे तुझ्यासाठी प्रार्थना करायचो .

तू दिल्लीला जात आहेस पण मला मात्र करमणार नाही आणि आजकाल मलापण त्रास खूप होतोय . आई जास्त वेळ कॉम्पुटर समोर बसू देत नाही . म्हणून तुला सर्व काही सांगतोय ,काही दिवसांनी कदाचित मी या जगात नसेन पण देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो कि , तू कुठेही राहा पण सुखात राहा . विवेकच तुझ्यावरच प्रेम कधीच कमी होऊ नये आणि तुझ त्याच्यावार्चाही . जर तुम्ही दोघे मानाने एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल , आणि मला माहित आहे कि हे लवकरच होईल , आणि तुझ्या pregnancy चा एक mail माझ्या inbox मध्ये पडला असेल . काय माहित मी असेन का नसेन …..एक प्रार्थना जरूर करेन माझ्यासाठी कि जर मी या जगातून गेलो तरी पुनर्जन्म घेऊन तुझ आणि विवेकच बाल म्हणून या जगात परत पाउल ठेवेन . सर्व काही ठीक होईल ,देवावर विश्वास ठेव आणि हो काळजी ghe स्वतःची ,विवेकाची आणि होणार्या बाळाची .

 

Mail वाचून एकदम shock झाले . मन अगदी सुन्न झाले .सुमती क्षेत्रामाडेंची ‘युगंधरा ’ वाचल्यानंतर झाल अगदी तसं .तुला call करायचा प्रयत्न केला , पण

तुमसे मिलके ऐसा लागा

तुमसे मिलके आरमा हुये पुरे दिलके

ऐ मेरी जाणे वफा

तेरी मेरी मेरी तेरी

एक जान हैं

साथ तेरे रहेंगे सदा ……..

हि callertune नुसतीच वाजत राहिली ,रोज तुला SMS, scrap करते पण उत्तर कधीच येत नाही .आज 3 महिन्यांनी तुला mail करते आहे .खरच तुझ्या प्रार्थनेत खूप शक्ती आहे ,ज्या ठिकाणी डॉक्टरांनी आशा सोडली होती तिथे तुझ्या प्रार्थनेमुळे चमत्कार घडला . आज तुला सांगावास वाटत कि मी pregnant आहे . जेव्हा विवेकला कळल तेव्हा त्याने मला उचलून गिरकीच घेतली पण मला तू हवा होतास त्या ठिकाणी . काय माहित का पण तू सांगितल्याप्रमाणे मी त्याच्याशी चांगल वागतेय आणि तोही खूप चांगला वागतोय माझ्याशी . खूप काळजी घेतोय माझी . तू स्वतःसाठी का नाही प्रार्थना केलीस …..का नाही ? माझ्या पोटात वाढणार बाल तुझ्या रूपात नाही याव हीच प्रार्थना देवाजवळ करते . माझ आयुष्य तुला लाभू दे ……..मनापासून फक्त तुलाच…

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।
==============
इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
“जय भवानी, जय शिवाजी”
– जय महाराष्ट्र
मन माझे तुझ्याकडे आहे,
कधी अंतर्मनात झाकून बघ.
मन गुंतवण्यात
वेगळीच मजा आहे,
तुझेही माझ्यात गुंतवून बघ.
प्रेमाच्या
गोड गोष्टी करताना
हळूच मिठीत मला घेऊन बघ.
कल्पनेतली ती उबदार
झुळूक
प्रत्यक्षातही कधी अनुभवून बघ.
क्षण काही जगलोत सोबत
आठवणीत
त्या माझ्या रमून बघ.
अथांग सागर तुझ्यावरच्या प्रेमाचा,
मनात
माझ्या बुडून बघ.
स्वप्न तुझेच फक्त डोळ्यात माझ्या
तू ते
माझ्या डोळ्यांनीच बघ.
बघता बघता तुला स्वतःला
हळूच माझेही स्वप्न
पाहून बघ.
जिवापाड प्रेम लावीन
तु थोडे तरी लावून बघ
मी
तर वेडी झालीच आहे
तुही प्रेमात माझ्या वेडा होऊन बघ.
जसा
तू सामावलायस माझ्यात
तसचं तुझ्यातही मला सामावून बघ
जरी तू वेगळा
अन् मी वेगळी
एकरूपता तरी जाणवेल बघ.
नाही करणार एवढे प्रेम
दुसरे कोणी
हवी तर परिक्षा घेऊन बघ
फक्त परिक्षेचा निकाल पहायला
जगी
तुझ्या मला असू दे बस्स !!
इतकी सुंदर का दिसते ती?
मनात माझ्या का ठसते ती?…
विचारता मी, टाळे उत्तर–
आणि खळाळुन का हसते ती?…
मैफल माझी सरल्यावरही
मिटून डोळे का बसते ती?…
मिटता डोळे समोर दिसते
आणि उघडता का नसते ती?…
भेटत नाही कधी तिला मी
तरी खुशाली का पुसते ती?…
कसे वागणे ‘अजब’ तिचे हे?
‘नसताना’ही का असते ती?…
इतकी सुंदर का दिसते ती?…
खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…
नक्किच i can fill that
जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !
खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !
i m just falling into love………i m just crashing into love
मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?
का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !
खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !
काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !
राणी तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!
राणी ये ना लवकर ….
तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते
I LOVE YOU…

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही , हा प्रश्न मला आजही पडतो . ………… ……… ……. प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात . माझी व्याख्या वेगळी आहे . ………… …….. प्रेम या शब्दाची व्याख्या अजूनपर्यंत कोणीही बनवू शकलं नाही. जो तो आपल्या मनानुसार प्रेमाची व्याख्या बनवतो . ………… ……… ……… ….. जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात , त्याची गणती नसते . पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात . क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे . ………… ……… .. आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती . आता वेळ जाता जात नाही…

एकूणच स्त्रियांची वैचारिक पातळी (??) आणि शाश्वत उत्तरांचा अभ्यास करुन आम्ही प्रेमपत्राचा एक नमुना बनविला आहे. तो पुढे देत आहे.
( पहिली गोष्ट म्हणजे मजकुर हा ठळक काळ्या रंगातच असावा त्यासाठी गुलाबी किंवा इतर कोणतेही मिळमिळीत रंग वापरु नयेत. त्याचप्रमाणे पत्राची सुरुवात ही प्रिय किंवा तत्सम समानार्थी शब्दांनी करु नये. हे आधुनिक मराठीतील सर्वात कालबाह्य शब्द आहेत.)
हे पहा अमुक तमुक, ( येथे मुलीचे पूर्ण नाव अपेक्षित . यामुळे हे पत्र चुकुन तिच्याकडे आलेले नसून तिच्यासाठीच लिहीलेले आहे याची तिला जाणीव होते.)
गेल्या ______ काळापासून आपण एकमेकांना चांगले ओळखत आहोत. ( चांगले हा शब्द शक्य तितका सुवाच्य आणि ठळक लिहावा.) म्हणूनच मी तुला पत्राद्वारे लग्नाची मागणी घालत आहे. तू एक हुशार मुलगी आहेस हे मला माहीत आहे . त्यामुळे तुला धक्का बसला असेल. त्यामुळे एका आठवड्याच्या मुदतीनंतर मला भेटून तुझा होकार कळव. भेटण्याची जागा आणि वेळ मला फोन केल्यानंतर तुला कळेलच .
तुझाच ,
तमुक अमुक (येथेही पूर्ण नांव )
काही शंका असल्यास लगेच निरसन केले जाईल. यशाची हमखास खात्री …