प्रेम पत्र

 

 

 

गमतीदार प्रेम पत्र

प्रिये ,

वडापाव दिसला की , मला तुझी आठवण येते. मग मला सांग, वडयाशिवाय पावाला म्हणजे माझ्याशिवाय तुला कसे रहावेसे वाटेल?
वड़्याशिवाय पावाला चव नसते. पावाशिवाय वड़्याला चव नसते. शेवटी वड़्याला पावात विलीन व्हायलाच लागते.
त्याचप्रमाणे तुझे आणि माझे मिलन झाल्याशिवाय आपल्या प्रीतीला चव कशी येईल? पत्र संपवतो. कारण माझा वडापाव आता खावून संपला आहे. पत्रावे उत्तर देखील वटाट़्याने भरलेल्या समोशासारखे देणे.

तुझा फक्त तुझाच
वडा…………

==============================

प्रिये,

तुझ्या आठवणींनी माझे मन पाण्यात टाकलेल्या चुन्याप्रमाणे खदखदते आहे.
प्रत्येकवेळी “O2” आत घेताना आणि “CO2” बाहेर सोडताना मला तुझीच आठवण येते. तुला हातात ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा तु हवेत उघड्या ठेवलेल्या ‘नेप्थॅलीनप्रमाणे’ उडुन जातेस. त्या विरहात माझे ह्र्दय ‘यलो फॉस्फरस’ प्रमाणे भुर्कन जळुन गेले. तु असशील तेथुन लोहकणांसारखी चुंबकाकडे आकर्षित हो !
मला अजुन ते दिवस आठवतात, जेव्हा प्रयोग शाळेत बसून मी तुझ्या डोळ्यांतील “अल्कोहोल” पीत असे. त्या नाजुक ओठातील ‘ग्लुकोज’ खाण्याचा मोह मला अनेक वेळा टाळावा लागला. ‘ऍक्टीव्हेटेड कंपाऊंड’ प्रमाणे असणारे तुझे सरळ केस, एका ओळीत लावलेल्या ‘टेस्ट ट्यूब’ प्रमाणे तुझे सुंदर दात, तुझ्या नाकातील चमकी’Ring Test’मध्ये येणाऱ्या Ring प्रमाणे भासे , तर कानातील रिंगा ‘ physical balance’ मधील पारड्याप्रमाणे लटकत असत.
दोन वेगळे रंग दाखवणाऱ्या ‘लिट्मस पेपरप्रमाणे’ तुझी व्रुत्ती आहे, हे माहीत नव्हत मला. आपण ‘बेन्झीन’ आणि ‘ऑईलचे’ मिश्रण आहोत हे माहीत नव्हत मला. आता सारेच संपले आहे. तुझ्या प्रिलिमनरी टेस्ट्मध्ये पास होऊनसुद्धा.

तुला धरणारा ब्युरेट स्टॅंण्ड.

==============================

प्रिये,

तुझ्या डोळ्यांनी पाठवलेला ई-मेल वाचता वाचता तुझ्या प्रेमाचा प्रोग्रॅम माझ्या हर्डडिस्कवर कधी लोड झाला मला पत्ताच नाही लागला, आता फक्त माझ्या डोळ्यांच्या डेस्कटॉप स्क्रीनवर तुझाच चेहरा डिस्प्ले होतोय. तुझ्याबद्दलच्या प्रेमाच्या विचारांचा प्रोग्रॅम माझ्या मेंदूच्या क्रॅश मेमरीच्या स्टोअरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर गेल्यामुळे मेंदूची प्रोसेसिंग सिस्टीम आता हॅन्ग होऊ लागली आहे.
सख्ये ! मी तुझ्या ह्रुदयाच्या ऍड्रेसवर बऱ्याच वेळा नजरेच्या नेट्वर्कमधून मॅपींग करायचा प्रयत्न केला. पण !! व्यर्थ !
मझ्या लाईफ सिस्टीम्ला सेव्ह करणारं आणि क्रॅश होण्यापासून वाचवणारं प्रेमाच सॉफ्ट्वेअर फक्त तुझ्याकडे आहे.
प्रिये ! तुझं हे प्रेमाचं पॅकेज तू माझ्या ह्रुदयाच्या डिस्कवर लोड करशील ना?

तुझ्याच प्रेमात हॅंग झालेला…..

==============================

प्रिये,

तुला आलिंगन एक चमचा,
चुंबन तीन चमचे,
दिवसातून तिन वेळा, दोन्ही एकाच वेळी, खरं सांगू, हे लिहीताना माझी छाती इतकी धड्धडते आहे, की स्टेथॅस्कोपचे बोंडूक मी माझ्याच छातीला लावलेय !
तू माझ्या दवाखन्यात घुसलीस आणि म्हणालीस, “मी किनई एका डॉक्टर नवऱ्याच्या शोधात आहे, पण डॉक्टरला कुठला एवढा वेळ? म्हणून मीच एकेका डॉक्टरची व्हिजीट घेतीय. हे माझे कार्ड, पसंत पडले तर कॉन्टॅक्ट करा !”
झालं ! त्याच क्षणी तू माझ्या ह्रुदयाच्या डाव्या जवनीकेत जाऊन बसलीस. ह्रुदयाचा आकार थोडा वाढला आहे , रागावू नकोस, तुझ्या आकाराबद्दल मी बोलत नाहीये. त्या दिवसापासून माझी नाडी तुझ्या चालीप्रमाणे झोके देत चाललीय. माझ्या छतीच्या ‘एक्स रे’ त तुझीच छबी आलीय. स्टेथॅस्कोपमधुन तुझाच मंजुळ आवाज ऎकू येतो. मी तुला ह्रुदयाच्या तीन रुम किचन ब्लॉकमधे सुखात ठेवीन (ह्रुदयाला चारच कप्पे आहेत म्हणुन नाईलाज आहे) .
मग माझी होशील ना ?

==============================

तुझ्या नंतर मी आता दुसरी मुलगी शोधतो आहे ♥
एक वर्षभर माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल
आभार तुझे मानतो आहे
तुझ्या नंतर मी आता
दुसरी मुलगी शोधतो आहे
तु सुद्धा आता
दुसरा कुनी शोधला असशील
रोज रोज त्याला
माझ्यासारखा पिळला असशील
तुला माहीत आहे
प्रेमासाठी किती STRUGGLE करावा लागतो
एका मुलीला पटवायला
किती घाम गाळावा लागतो
तुला लिहीलेल्या प्रेमपत्रांची
आजही आठवन ताजी आहे
पुढचे प्रेम करायला
मला त्यांची गरज आहे
आपल्या प्रेमापायी तुला दिलेले
सर्व GIFT सुद्धा हवे आहे
अर्ध्या किंमतीत सुद्धा त्यांना
विकत घ्यायला मी तयार आहे
तुझ्यावर केलेला सर्व खर्च
आजही माझ्याकडे तयार आहे
CHECK घ्यायचा की CASH घ्यायची
यावर विचार सुरु आहे
अरे हो…
तुझा तर माझ्यावर
कोनताही खर्च नसेल
कारन पर्स नेहमी घरी विसरने
तुझे आजही सुटले नसेल
तुझ्याकडे मी दिलेला
माझा फोटो मला हवा आहे
मुलींना IMPRESS करायला
तोच तर एक दुवा आहे
तुझ्याकडुन मिळालेल्या सर्वच वस्तुंचा
माझ्या पुढच्या प्रेमावर मी वर्षाव करील
तुला जसे PROPOSE केले होते
तसेच मी तिला पन करील
म्हनुन मला माझे
सर्व तु परत कर

==============================

प्रिय युक्ता’ डॉट कॉम’

मित्रांबरोबर ‘ सर्फिंग करत असताना . विंडो ९५’ मध्ये उभी असलेली तू दिसलीस आणि तोंडून नकळत ‘याहू ..’ निघाले. वाटले तुझ्या ‘ सायबरपॅलेस’ मध्ये येऊन ‘ च्याट’ करावे, पण भितीचा’ व्हायरस’ अंगातून वाहु लागल्याने विचार मनातून काढून टाकला. आपल्या पहील्या भेटीची डेटा इंट्री अजूनही मनात ताजीच आहे. आपल्या प्रेमाची बोंब तुझ्या घरात एनसर्ट झाली तेव्हाच माझ्यावरील रागही ‘ एन्टर’ झाला असेल. तरीही आपल्या प्रेमाचा कर्व्ह वर जातच राहीला.
माऊस फिरवल्यागत तुझ्या हळूवार आठवणी सतत मनात येत राहिल्या, तुझ्या पिताश्रींनी मल्ल पाठवून मला ‘ डिलीट’ करण्याचा प्रयत्नही केला. तुझ्या ‘ वायटुके’ भवांच्या धमकीनंतरही विंडो २००० मध्ये माझे प्रेम तसेच कायम आहे.

==============================

एक गोड प्रेमपत्र

खरच विश्वास नाहि मला
हेच ते डोळे आहेत का?जे मला नेहमी टाळायचे
तेच आज माझ्या प्रेमाने भरुन आले आहेत !
हा भास तर नाहि ना पन मला ते जानवतय…
नक्किच i can fill that
जेंव्हा तु एकदा फोन ठेवतान sweet dreams म्हणताना
हळुच म्हनालीस miss u तेंव्हाच कळल होत मला
तुही माझ्या प्रेमात पडली आहेस !
खरच मला नाहि अजुन विश्वास
तु कित्ति गोड हसतेस हल्लि…
मध्य रात्रिचे तुझे sms वाचताना
मन माझ कित्ति आनंदि असत !
i m just falling into love………i m just crashing into love
मी तुझ्या प्रेमात वेडा तर नाहि ना होत आहे?
का तु माझ्या प्रेमाला नाहि नाहि म्हनुन मला त्रास दिलास…
पन तो त्रास हि कित्ति मस्त होता जितक कि तुझ लाजुन माझ्या मीठित सामावुन जान !
खरच नाहि मला विश्वास अजुनही कित्ति जपतेस तु मला त्यामुळेच कि काय तुझी आठवन
आलि कि मी गुदमरुन जातो…कारन तु कुठेच नसतेस तरिहि फ़ार जवळ असतेस, अगदी जवळ !
काय मस्त प्रवास होता तो तितकाच जीवघेना…
तुला विचारन्या पासुन ते, तु हो म्हने पर्यंतचा…
तुच सांगितलस मला कि हे जग कस वाइट असत ते आणि तु कित्ति चांगला आहेस ते !
राणी तुझि फ़ार आठवन येते…. आज पहाटे माझ्या गाली
तुझ्या अधरांचा स्पर्श झाला… तु जवळ नव्हतीसतरिही जीव माझा मोहरुन गेला…!
राणी ये ना लवकर ….
तुझ्या वाचुन जगन्याची सवय झाली आहे… अश्रुंवाचुन रडण्याची सवय झाली आहे …!
तुझी फ़ार आठवन येते

I LOVE YOU.

==============================
Advertisements
प्रतिक्रिया
 1. SUBHASH GORIVALE म्हणतो आहे:

  hi………..

 2. TUKA म्हणतो आहे:

  i love you

 3. nikhil म्हणतो आहे:

  खुप छान

 4. sandeep म्हणतो आहे:

  nice prem kavita

 5. 9579835280 म्हणतो आहे:

  NICE……………………..!!!!!!!!!!!!!!!

 6. Sandesh Patil म्हणतो आहे:

  NICE……………………

 7. pravin kharat म्हणतो आहे:

  एकदम झक्कास

 8. pravin kharat म्हणतो आहे:

  $€”very nice”€
  ;-very good

  i find one sweet g.freind

 9. yogesh dhenge म्हणतो आहे:

  like this

 10. yogesh dhenge म्हणतो आहे:

  verry nice this words

 11. shuibham kakde म्हणतो आहे:

  lay bhaaari.

 12. Yogesh Dhenge म्हणतो आहे:

  mala tar marathi prem patra khup aavadtata aani vachayla pan aavadtat……………

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s