विनोदी कविता

तू सुई, मी दोरा

तू काळी, मी गोरा

तू पोळी, मी भात

तू फुटबॉल, मी लाथ

तू बशी, मी कप

तू उशी, मी झोप

तू बॉल, मी बॅट

तू उंदीर, मी कॅट

मी मुंगळा, तू मुंगी

तू साडी, मी लुन्गी

तू लव्ह, मी प्रेम

तू फोटो, मी फ्रेम

तू डोकं, मी केस

तू साबण, मी फेस

तू निसर्ग, मी फिजा

तू कविता, “मी माझा”

तू घुबड, मी पंख

तू विंचू, मी डंख

तू साम्बार, मी डोसा

तू बॉक्सर, मी ठोसा

तू कणीक, मी पोळी

तू औषध, मी गोळी

तू पेट्रोल, मी कार

तू दारु, मी बार

तू दूध, मी साय

तू केस, मी डाय

तू चहा, मी लस्सी

तू कुमकुम, मी जस्सी

तू तूप, मी लोणी

तू द्रवीड, मी धोनी

तू बर्फी, मी पेढा

तू बावळट, मी वेडा

तू कंप्यूटर, मी सीडी

तू सिगरेट, मी बीडी

तू दही, मी लोणी

तू केस, मी पोनी

तू कंप्यूटर, मी मेल

तू निरांजन, मी तेल

तू टायगर, मी लायन

तू दादर, मी सायन

तू टक्कल, मी केस

तू कन्टीन, मी मेस

तू केस, मी कोंडा

तू दगड, मी धोंडा

****************************

…तुटे वजनाचा काटा !

आठवण तुझी येता,

फुले अंगावर काटा,

असं मी नाही म्हणत,

म्हणे वजनाचा काटा !

तुझ्या देहाच्या ह्या सीमा,

आठी दिशांना फैलती,

म्हणुनीच सारे तुला,

‘अष्टफैलु’ गं म्हणती !

पहा अजस्त्र केव्हढा,

तुझा देह बलदंड,

आता बाहु म्हणु ह्यांना,

का भीमाचे गं हे दंड !

जेव्हा पाऊल टाकीशी,

दणदणते धरणी,

देवा काय वर्णावी ही,

तुझी ‘अगाध’ करणी !

काल हॉटेलात गेली,

तेव्हा मालक म्हणाला,

‘आधी डिपॉझीट ठेवा,

मग ऑर्डरचं बोला’ !

जेव्हा जाते शिंप्याकडे,

द्याया कपड्याचे माप,

शिंपी पुटपुटे मनी,

अ ब ब ब, बाप बाप !

केली घोडेस्वारी हिने,

कमी करण्या वजन,

हिच्याऐवजी हो झाले,

कमी घोड्याचे वजन !

ऑटोरिक्शावाले हिला,

बघुनीच सुसांटती,

संपेस्तोवर पेट्रोल,

गाडी बेफाम हाणिती !

म्हणे जाऊनी वैद्याला,

झाली भुक कमी फार,

न्याहारीला फक्त पिते,

दुध लिटर मी चार !

येतो थकवा हो फार,

‘भारी’ पडतात कष्ट,

आता सुचवा ना गडे,

मला थोडी बेड-रेस्ट !

‘नको नको’ म्हणे वैद्य,

उगा बेडला का कष्ट?

द्यावी लागेल बेडला

पर्मनंट ‘बेड-रेस्ट’ !

****************************

एक पोट्टी…..

एक पोट्टी रोज माह्या

सपनामंधी येते

हिचक विचक खाता पेता

उचकी देऊन जाते

थयथय नाचे मनामंधी

मोरनी हाय जशी

येड लावुन जाते

तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक

माह्यासमोर आली

पाहुन मले काय सांगु

खुदकन हसुन गेली

म्या म्हनलं काय ती

हिच पोट्टी हाय

कोनबी असुदे यार

पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा

दिवसा दिसुन जाते

कं दिवसा पाह्यलेली पोट्टी

पुन्हा सपनामंधी येते

काय करु चायला

पुरता लोचा झाला

माह्या मनाच्या डुगडुगीचा

चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले

एक वाटे अप्सरा

चायला सपनातल्या पोट्टीचं

रुप दिवसा आठवत नाही

तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं

रुप मनी साठवत नाही

डोये खुल्ले तवा माह्या

ध्यानामंधी आलं

दिवसाढवळ्या सपन पाहुन

कोनाचं भलं झालं….

****************************

रात्र रात्र जागून


खूप अभ्यास केला


बऱ्याच एक्झाममध्ये

साला top हि केला ……

पण एका दिवशी

घडलं आक्रीत …………

प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा

पुरता पोपटच झाला

बोलू बोलू तिच्याशी

घाबरून दिवस दवडताना

मला आवडणारी मैना

मेला कावळाच घेऊन गेला

आणि मित्रानो…….

प्रेमाच्या एक्झाममध्ये माझा

पुरता पोपटच झाला

पुरता पोपटच झाला ……

****************************

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमानअहो ऐकलं का ?


आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते


बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते

अणी बाईक पूस्ण्याचे आम्ही काधिच श्र म घेत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो


मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भ र खातो

अणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो


काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो

अणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आम चे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,


दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,

अणी आमचा फोन कधीच जास्त एंगएज येत नाही

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

मीत्रांच्या सगळ्या पल्यान मध्ये आम्ही शामील असतो,


कधीच दूसर्र्यांच्या पल्यान्स मध्ये तोंड घालत नाही,

सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

लोकांना टाळयायला आम्च्या कडे बाहाने नसतात,


आमचे तर बूवा अड्डे सग्ळ्यांनाच माहीत असतात,

अणी ठ. रल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सुट्ट्या अणी एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नस.ते,


बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बरथडेट असते,

बाकी तारखा लकश्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,

कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,


टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,

अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,

कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,


तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,

सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,

अणी अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,

कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही…!


****************************

कधी कोणी समजू शकतो का या मुलींना?


समजून सगळे

नासमज बनतात मुली

चांगल्या चांगल्या मुलांना

वेडयात काढतात या मुली

अनोलखी पुरुषाला

दादा – भैय्या म्हणतात या मुली ,

पण आपल्याच वडलान्ना

काका का म्हणतात या मुली ,

बोलायला गेलो तर

लाइन मारतोय म्हणतात या मुली,

मग नाहीच बोललो की

शाइन मारतोय का म्हणतात या मुली?

मुद्द्याच बोलण थोड़च असत

तरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,

जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ….

तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?

पावसात भिजायच तर असत

तरी चिखल पाहून नाक का मुरडतात मुली ?

थंडी गुलाबीच चांगली अस म्हणतात!!!

मग 2-4 स्वेटर घालून सुद्धा कुडकुडतात का या मुली ??

वाचून ही कविता

चान्ग्ल्याच भडकतिल या मुली !!!!!

मग (कदाचित) विचार करून मनात…

थोड़ तरी बरोबर आहे महणतील या मुली …


****************************

मी फार टेक्नीकल बोलतो,


अस सारख वाटत होत तिला,


“मै ऐसा ही हूँ ” म्हणुन ,

सांगू तरी कस तिला .

ती म्हणते बघ ना रे,


सुटलाय धुंद गार वारा,

मी म्हणतो हवामान खात्याने,

दिला होता कालच इशारा.

ती म्हणते हात तुझा ,


किती उबदार वाटतो मला,

मी म्हणतो बहुतेक असेल ,

किंचितसा ताप मला.

मी म्हणतो समुद्राच्या पाण्यात ,


कैल्शियम च फेस आहे ,

ती म्हणते काही सांगू नकोस ,

तू मोठी सायकोलोजिकल केस आहेस .

ती रोमांस मधली नजाकत मला सांगते,


मी सुद्धा गुणसुत्रांची गुंतागुंत सांगतो,

ती कपाळावर स्वतःच्या मारून घेते ,

मी पुढच्या वाक्याची वाट पाहतो .

आता हळू हळू मला प्रेमाचे,


विज्ञान कळायाला लागलय ,

तिलापन माझ्या सोबत राहून,

विज्ञानावर प्रेम बसलय.

****************************
Advertisements
प्रतिक्रिया
 1. pravin aute म्हणतो आहे:

  kar bolala yar tu

 2. vishal म्हणतो आहे:

  zakkas

 3. aditya म्हणतो आहे:

  very realistick

 4. Mohini Mohite म्हणतो आहे:

  funny poem……….

 5. Revati Ugale म्हणतो आहे:

  I like this!!!!!!!!!!!!!

 6. hanuman agivale म्हणतो आहे:

  I like this kavita…..

 7. prathamesh म्हणतो आहे:

  goooooooooooooooood

 8. Kiran Londhe म्हणतो आहे:

  hi……..hi……hi……..

 9. rakesh म्हणतो आहे:

  nice

 10. rakesh म्हणतो आहे:

  khup -khup chhan kavita aahet

 11. vipul म्हणतो आहे:

  verry nice !!!!!
  verry fun !!!!!

 12. Suyog Birari म्हणतो आहे:

  mastttt yarrr

 13. joyseayes म्हणतो आहे:

  udatya tabakadya……..mast

 14. anil म्हणतो आहे:

  mala aawdale

 15. Sunil Gangawane म्हणतो आहे:

  No.1

 16. sanket म्हणतो आहे:

  mast yar

 17. swati म्हणतो आहे:

  so sweet!!!!

 18. sarita म्हणतो आहे:

  zakkas

 19. sarita म्हणतो आहे:

  SO SWEET!!!

 20. subhash म्हणतो आहे:

  i like this

 21. thorat umesh म्हणतो आहे:

  very very best this poems.

 22. sayali patil म्हणतो आहे:

  thodi jastich khechliy nahi ka mulinchi……

 23. swapnali sonawane म्हणतो आहे:

  very funny poem and so nice………………

 24. suhas म्हणतो आहे:

  Zakassss….

 25. akshay म्हणतो आहे:

  nice ha plz azun uplod kara

 26. machindra ainapure म्हणतो आहे:

  vva! kya bat hai.

 27. shubhangi म्हणतो आहे:

  very funny this poem

 28. samp patil म्हणतो आहे:

  itke fadtat ka leka kapde? but good poem

 29. Mangalsingh Dhanawat म्हणतो आहे:

  Very nice and healthy !!! Yes healthy coz laughter is the lighter way of life…..
  I loved those.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s