मी खुप काही केल…फक्त तुझ्यासाठी…

Posted: ऑगस्ट 8, 2010 in इतर कविता
टॅगस्, , ,
तुझ्यासाठी .
माझ वागन देखिल बदलल
रागित स्वभाव सोडून ,
शांत स्वभाव केल,
कारण तुझ्या रागावर माझा राग म्हणजे
तापलेल्या तव्यावर शिम्पडलेले पानी.
मी प्युर वेजेटेरियन ची
नॉन -वेजिटेरियन झाले ,
त्रास झाला थोडा ,पण केल
फक्त तुझ्यासाठी.
पाउस म्हणजे माझा जिव होता पण
तुला चिखल- पाउस आवडत नाही म्हणून,
मी पावसात ओल-चिम्ब होणे सोडून दिल आहे ,
फक्त तुझ्यासाठी.
मी दिलेली वस्तु जपून ठेवायची,
अशी माझी ताकीद असायची,
माझी वस्तु हरवल्यास मी कधी त्या व्यक्तीला
पुन्हा काही दिले नाही .
पण मी तुला देत राहिले
आणि तू हरवत राहिला ,
आणि तरी मी तुला देतच राहिले.
फक्त तुझ्यासाठी .
माझ्या जीवनाच्या शब्दकोशात ,
कधी नसलेला शब्द ”प्रेम ”
माझ्या हृदयाने कोरुन लिहिला आहे,
फक्त तुझ्यासाठी .
मी तुझ्यासाठी मला पूर्ण बदलल ,
पण तू माझ्यासाठी कण भर सुद्दा
बदलला नाही??
आणि हां प्रश्न मी तुला कधीच केला नाही ,
कारण मी तुझ्यावर ”प्रेम” केल
फक्त ”तुझ्यावर प्रेम केल”…
प्रतिक्रिया
  1. jadhav tanaji kalyan म्हणतो आहे:

    please send about love poem

यावर आपले मत नोंदवा